बार्शीत हिंदू खाटीक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व शालेय साहित्य वाटप

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील हिंदू खाटीक समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गुरुवार दि. 5 रोजी सोलापूर रोड येथील V K मार्ट समोरील हिंदू खाटीक समाज सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार राजेंद्र राऊत, बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, तहसीलदार एफ. आर. शेख, बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, हिंदू खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणराव गालिंदे, हिंदू खाटीक समाजाचे मा. अध्यक्ष व्यंकट बेंद्रे ,प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे पार्थ गालिंदे, युवा प्रदेशाध्यक्ष रोहित थोरात,सोलापूर हिंदू खाटीक समाजाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकवाड,आसिफभाई तांबोळी,बार्शी हिंदू खाटीक समाजाचे अध्यक्ष शिवाजीराव जठार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र राऊत म्हणाले की शहरातील खाटीक समाज हा कष्ट करणारा समाज आहे. त्यांच्या कार्यक्रमासाठी सभागृहाची आवश्यकता असल्याने मी आमदार असताना आमदार फंडातून त्यांना 35 लाख रुपये खर्च करून सभागृह उपलब्ध करून दिले आहे. या सभागृहाचा वापर चांगल्या कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी करावा तसेच या सभागृहाच्या सुरक्षिततेसाठी संरक्षण भिंत, पाण्यासाठी बोअरची व्यवस्था तसेच स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

हिंदू खाटीक समाजाने आयोजित केलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम स्तुत्य असून यामुळे समाजातील पुढच्या पिढीला याचा चांगला उपयोग होणार असून गुणवंत विद्यार्थ्यांचा झालेला सन्मानामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. उपस्थित सर्व पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह तसेच गरजू मुला मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रम घेतल्याबद्दल बार्शीतील हिंदू खाटीक समाज बांधवांचे आभार मानले.

कार्यक्रमासाठी समाजातील बांधावासोबतच महिला व गुणवंत विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजातील बांधव व युवक आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निता देव यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या