पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

तृतीयपंथीयांसाठीच्या योगदानासाठी बार्शीचे सचिन वायकुळे यांचा पुण्यात महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी, दि. २८ : वंचिततेच्याही पलीकडे असणारा तृतीयपंथी घटक व देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल ‘ येथील सचिन वायकुळे यांना पुण्यात महागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील , आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राचे प्रमुख ओमप्रकाश शेटे व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वायकुळे यांचा हा गौरव करण्यात आला. डिजीटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या वतीने हा गौरव करण्यात आला. संघटनेचे संस्थापक राजा माने यावेळी उपस्थित होते.

तृतीयपंथी व देहविक्रय करणाऱ्या महिलांना आधार कार्ड, रेशन कार्ड , मतदान ओळखपत्र , घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणे , तृतीयपंथी यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणे आदींसाठी यासाठी वायकुळे यांनी मोठे योगदान दिले आहे. तृतीय पंथी समुदायाच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी आपण तत्पर असून यासाठी मुंबईत बैठक घेणार असल्याचे आयुष्मान भारतचे शेटे म्हणले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button