महाराष्ट्र

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र सातारा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

सातारा : सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र सातारा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच परिषदेचे स्थापनेपासून आज पर्यंतचे कार्याचे पोपटराव पवार यांनी कौतुक केले. सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना न्याय देणारे व ग्रामीण महाराष्ट्रासाठी उपयुक्त असलेले काम चालू आहे. त्यांच्या पाठीशी सबंध महाराष्ट्रातील सरपंचांनी खंबीरपणे उभारावे असेही त्यांनी आवाहन केले. पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासोबत सातारा जिल्ह्याच्या वतीने दत्ताभाऊ काकडे व ऍड विकास जाधव यांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या सोबतचा सन्मान माझ्या वरील व दत्ताभाऊ वरील जबाबदारी वाढणारा आहे. तसेच ती जबाबदारी पेलण्यासाठी बळ देणारा आहे. यावेळी सरपंच परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा डीसीसी बँकेचे संचालक नितीनकाका पाटील सरपंच परिषदेचे राज्य विश्वस्त आनंद जाधव जिल्हा उपाध्यक्ष अरुणभाऊ कापसे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष समाधान पोकळे जिल्हा सरचिटणीस शत्रुघ्न धनावडे महिला जिल्हा समन्वयक अरुणाताई जाधव यांचेसह सर्व पदाधिकाऱी व सातारा जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button