धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

धाराशिव : महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण आयुक्तालयाच्या विद्यमाने नागपूर येथे २१ ते २३ मार्च २०२५ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

अस्थिव्यंग प्रवर्गातील स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकूण ३१ पदके पटकावली.एक निवासी अपंग शाळा,सास्तूर येथील विद्यार्थ्यांनी १३ सुवर्ण,६ रजत आणि ४ कांस्य अशी एकूण २३ पदके मिळवली.ब्रिलियंट अपंग प्रशिक्षण केंद्र,बेंबळी येथील विद्यार्थ्यांनी ३ सुवर्ण आणि ६ रजत पदके मिळवली,तर नवजीवन अपंग प्रशिक्षण केंद्र,खानापूर येथील विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण आणि १ कांस्य पदक पटकावले.

मतिमंद प्रवर्गातही जिल्ह्याने उज्ज्वल कामगिरी केली.स्वाधार मतिमंद मुलींचे बालगृह/शाळा,आळणी येथील विद्यार्थ्यांनी ११ सुवर्ण,३ रजत आणि १ कांस्य अशी एकूण १५ पदके मिळवली.

तुळजाभवानी मतिमंद मुलांची बालगृह/शाळा,एकुरगावाडी येथील विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण आणि २ रजत पदके पटकावली. सिद्धाराम म्हेत्रे मतिमंद निवासी शाळा, आंबेवाडी येथील विद्यार्थ्यांनी ३ सुवर्ण आणि २ रजत पदके जिंकली.एकूण ५४ पदकांची कमाई करत धाराशिव जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. विजयी खेळाडूंचे व शाळेतील कर्मचाऱ्यांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खामितकर यांनी अभिनंदन करुन सत्कार केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या