महेदिया समाजाच्या वतीने बार्शी येथे रोजा इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील मेहदी नगर येथे २२ मार्च रोजी महेदिया समाजाच्या वतीने भव्य रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मा. नगरसेवक महादिमिया लांडगे यांनी केले होते. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
या इफ्तार पार्टीसाठी आमदार दिलीप सोपल आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकेडे हे प्रमुख उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समाजातर्फे शेहजादे मौलवी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपनगराध्यक्ष कृष्णाराज बारबोले, मनिष चव्हाण, नगरसेवक देवकर, राहुल कोंढारे, किरण देशमुख, विवेक गजाशिव, शोएब सय्यद, प्रशांत शेटे, पासाभाई शेख, बाबू काळे, लालू सौदागर, उस्मान अलीशाह यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सर्वांनी एकत्र येऊन इफ्तार करत रमजानच्या पवित्र महिन्यातील सामूहिक उपवास सोडला. यावेळी समाजातील एकोपा आणि बंधुभाव वाढीस लागावा, यासाठी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. महेदिया समाजाच्या वतीने अशा उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि सहकार्य वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महादिमिया लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांनी इफ्तार भोजनाचा आस्वाद घेत आपुलकीचे दर्शन घडवले.