छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विस्तारासाठी राज्य शासनाने 500 कोटींचा निधी द्यावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपती संभाजी नगर : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विस्तार करून मेडिकला कॉलेज ; नर्सिंग कॉलेज; हॉस्टेल आदी उपक्रम राबवून महाविद्यालयांच्या जुन्या इमारतींचे नूतनीकरण करून पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विकास करण्यासाठी राज्य सरकार ने 500 कोटींचा निधी दोन टप्प्यात द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली.

छत्रपती संभाजी नगर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागसेन वन या भागात पी ई एस पॉलिटेक्निक महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सलंस लर्निग चे उद्घाटन पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत चेअरमन म्हणून ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.या सेंटर मध्ये 100 संगणक संच उभारण्यात आले आहेत. यावेळी पी ई एस पॉलिटेक्निक चे प्रिन्सिपॉल प्राचार्य त्र्यंबक कदम; रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव कदम; मिलिंद शेळके; पी ई एस चे विश्वस्त ऍड बी के बर्वे; वामन आचार्य; यू एम मस्के; चंद्रशेखर कांबळे ; विजय मगरे; नागराज गायकवाड बाळकृष्ण इंगळे
आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

पी ई एस चे काही प्राचार्य आमचे ऐकत नाहीत.त्यांना दोन महिन्यांची मुदत देतो.त्यांनी जर ऐकले नाही तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल.पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा कायदेशीर अधिकृत अध्यक्ष मीच आहे.दादागिरी काय करता …दादागिरी करीतच मी दिल्लीपर्यंत पोहोचलो आहे.मात्र आपल्याला वाद करायचा नाही. विरोधकांना काय म्हणणे मांडायचे असेल ते कायदेशीर मांडावे.तुमच्या कडे कायदेशीर काही बाजू असेल तर मांडा असा टोला न.रामदास आठवले यांनी विरोधकांना लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button