महाराष्ट्रलातूर

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वृक्षांवर धान्य व पिण्याच्या पाण्याची सोय

B1न्यूज मराठी नेटवर्क

लातूर : जागतिक चिमणी दिवसानिमित्त जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वृक्षांवर धान्य व पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. वन विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. आगामी उन्हाळा लक्षात घेवून लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरातील वृक्षावर चिमण्यांसाठी अशाप्रकारे छोट्या भांड्यात खाद्य व पिण्याचे पाणी ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.

उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, संदीप कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांच्यासह वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पोटे, वन परिमंडळ अधिकारी निलेश बिराजदार, वनरक्षक बालाजी पाटील, महेश पवार, गोविंद घुले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चिमण्यांसाठी धान्य व पिण्याचे पाणी ठेवण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी स्वतःच्या निवासस्थानीही वृक्षांवर चिमण्यांसाठी अशी सुविधा केली. तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांनीही आपल्या घराच्या बाल्कनीत, परिसरातील वृक्षांवर पक्ष्यांसाठी अशाप्रकारे धान्य व पाणी ठेवण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button