छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्रशिबीर

ग्रामिण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांगांसाठीविशेष शिबिरे आयोजीत करा- जिल्हाधिकारी स्वामी

B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : सुकर जीवनासाठी दिव्यांगांना सर्व शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावयाचे असून त्यासाठी दिव्यांगांची तपासणी व नोंदणी ग्रामिण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये येथे विशेष शिबिरे आयोजीत करुन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.बी, चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, आश्विनी लाटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, महानगरपालिकेचे समाज कल्याण उपआयुक्त लकीचंद चव्हाण, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे ए.के.शेख, जिल्हा आरोग्य विभागाचे प्रतिनिधी डॉ. महेश लड्डा, बार्टी कार्यालयाचे प्रतिनिधी योगेश सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी चौरे, महाज्योती कार्यालयाचे चंद्रशेखर वडले, यांच्यासह समितीचे सदस्य या बैठकीस उपस्थित होते.

यावेळी आरोग्य तपासणीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यात ग्रामिण रुग्णालय कन्नड, पाचोड, पैठण, उपजिल्हा रुग्णालय गंगापूर, वैजापूर येथे शुक्रवार दि.२८ मार्च व शुक्रवार दि.४ एप्रिल रोजी शिबिरे होतील. उपजिल्हा रुग्णालय सोयग्व, सिल्लोड येथे २७ मार्च ३ एप्रिल , जिल्हा रुग्णालय व फुलंब्री येथे सोमवार दि.२४ मार्च, बुधवार दि.२६ मार्च, २ एप्रिल , शुक्रवार दि.२८ मर्च व ४ एप्रिल रोजी तपासणी होईल. ही शिबिरे सकाळी ९ ते दुपारी एक या वेळात होतील.

या शिबिरांमध्ये तपासणीसाठी येतांना आधार कार्ड, दिव्यांगत्व प्रमाणपत्र असल्यास ते तसेच अन्य आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. त्यावरुन दिव्यांगांना आवश्यक असलेल्या योजना ठरवून त्यांना लाभ देण्याचे निश्चित केले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button