बार्शी

अमन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने लसीकरण शिबीर संपन्न

B1न्युज मराठी नेटवर्क

बार्शी : आपला प्रभाग आपली जबाबदारी, लस आपल्या दारी या नुसार बार्शी एन.यु.एच.एम यांच्या सहकार्याने अमन बहुउद्देशीय संस्थेचे कोरोना प्रतिबंधीत लसीचे सलग आठ दिवसात दुसरे लसीकरण शिबीर आज संस्थेचे संस्थापक नगरसेवक कय्युम पटेल व सचिव विजय पाचपुते,मेजर इब्राहिम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
आज 170 नागरिकांनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जाफर पटेल,मुस्ताक जलसे,शफिक पठाण, अलीम आतार,माजीद पटेल, आर्यन पाचपुते, हमीद पटेल इ. यांनी रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन, व नागरिकांपर्यत आजच्या लसीकरणाची माहिती पोहचवण्याचे कार्य केले. सततच्या लसीकरणाच्या ताणतणावात एन.यु.एच.एम कर्मचारी डॉ. लाड सर, नागनाथ मिरगणे, सुरवसे मॅडम,ऑपरेटर निखिल धुमाळ, अंगणवाडी सेविका दळवी मॅडम, करंजकर मॅडम यांनी लसीकरणाला सातत्याने गती देत असल्याबद्दल यांचे सर्वच स्थरावर विशेष कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button