बार्शीत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी मोर्चा; तहसीलदारांना निवेदन सादर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बुद्धगया येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बार्शीतून भव्य मोर्चा काढण्यात आला. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने आयोजित या मोर्चात मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते. तहसील कार्यालयावर धडक दिल्यानंतर तहसीलदार एफ. आर. शेख यांना निवेदन सादर करण्यात आले.

मोर्चाची सुरुवात भीमनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून झाली. या ठिकाणी बौद्ध अनुयायांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांचे समर्थन केले. त्यानंतर मोर्चा नगरपालिकेकडे गेला आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काही वेळ थांबून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला वंदन करून पुढे मोर्चाने तहसील कार्यालयाकडे कूच केली. तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मोर्चाच्या उद्देशाबद्दल सविस्तर माहिती दिली.

मुख्य मागण्या:

  1. महाबोधी महाविहारचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे.
  2. 1949 च्या व्यवस्थापन अधिनियमाचे पुनरावलोकन करून तत्काळ रद्द करावे.
  3. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार ब्राह्मण महंतांच्या ताब्यातून मुक्त करावा.

निवेदन सादर करताना उपस्थित मान्यवर:

आयु. तानाजी बोकेफोडे, भाऊसाहेब कांबळे, अॅड. प्रसन्नजीत नाईकनवरे, सचिन सोनवणे, सनी गायकवाड, आनंद भोसले, अॅड. शंकर ननवरे, शरद बनसोडे, महेंद्र भोसले, अॅड. विवेक गजेशिव, कनिष्क शिंदे, सत्यजीत जानराव, धिरण भोसले, योगेश अय्यर, सुमित खुरंगुळे, सूर्या मस्के, चंदनशिवे असतम, दिलीप सरवदे, प्रा. अशोक वाघमारे, परिकर पी. के. , बाळासाहेब भालेराव, बळी बोकेफोडे , रमेश शंकर दादा वाघमारे, विनोद ननवरे, सत्यजीत जानराव, चंद्रमणी बोकेफोडे, रमेश गवळी, दयानंद कदम, आदी मान्यवर या आंदोलनात सहभागी झाले होते.

तहसीलदार एफ. आर. शेख यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले आणि यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. बार्शीत झालेल्या या भव्य मोर्च्यामुळे बौद्ध समाजाच्या मागण्यांना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या