बार्शीशैक्षणिक

कु.आराध्या महेश गुळवे हीची स्केटिंग या खेळासाठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क

बाार्शी : रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने औरंगाबाद येथे राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली यात कु. आराध्या गुळवे हिने गोल्ड मेडल मिळवले आहे.तिचे राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. रविवार दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी औरंगाबाद येथे रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडिया वतीने राज्य स्तरीय स्पर्धा घेण्यात आली.बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लब ने दणदणीत यश संपादन करून गोवा येथे होणाऱ्या नॅशनल स्केटिंग स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.यामध्ये आराध्या महेश गुळवे, रेणुका गायकवाड,यश नान्नजकर, श्रवण दुधाने,यांना गोल्ड मेडल,सोहम देशमुख आयुष्य मन्ने यांना सिल्वर मेडल तर आदित्य माळी पृथ्वीराज कदम व हार्दिक रुणवाल यांना ब्रौंझ मैडल अशाप्रकारे पदकांची कमाई केली आहे. या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक श्री गणेश रोडे सर व वेळोवेळी मुलांना मार्गदर्शन करणारे संस्थेचे अध्यक्ष जाधव सर यांचेही कौतुक गुळवे परिवाराने केले आहे.आराध्या चे आजोबा रामलिंग गुळवे व आजी मंगल गुळवे आणि सर्व नातेवाईकांनी त्या मुलांना गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button