बार्शी

छत्रपती शिवाजी चौकातील रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी

B1न्युज मराठी नेटवर्क / वैराग : गौतम नागटिळक

वैराग : गेेल्या आठ महिन्यापासूूून बार्शी – सोलापूर रस्त्याचे काम सुरु असून सदर काम अत्यंत संथ गतीने चालू होते . येथील मुख्य छत्रपती शिवाजी चौकातील रस्त्याचे काम संथ गतीने होत असून लवकरात लवकर चांगल्या दर्जाचे काम करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे . गेल्या सात-आठ महिन्यांपासून सोलापूर- बार्शी रस्त्यावरील रस्त्याचे काम सुरू आहे .सदर काम संथ गतीने सुरू असून वैराग शहरा मधील सध्या रस्ता उखडून सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात येत आहे .परंतु छत्रपती शिवाजी चौका हे काम सुरू आहे .

छत्रपती शिवाजी चौकातून एक रस्ता पूर्वेला मुख्य वैराग मध्ये ,दक्षिण चा रस्ता सोलापूरकडे ,पश्चिमेचा रस्ता एसटी स्टँड व माढयाकडे तर उत्तरेचा रस्ता बार्शी कडे जातो .नेमके चौकातच रस्त्याचे काम सुरू आहे .रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने मुख्य चौकातच वाहतुकीची कोंडी होत असून वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे . वैरागचा बाजार बुधवारी असतो त्या दिवशी इतर नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून काम बंद ठेवणे सहाजिक आहे परंतु रस्ता खोदून सुद्धा इतर वारी काम बंद असल्याने आणि त्यात रस्ता खोदला असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .

नेमके चौकातच रस्त्याचे काम सुरू असून रस्त्यााच्या ज्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहेे त्या बाजूला कोणताहीी फलक न लावता सुरक्षिततेची न काळजी घेता सदर रस्त्याचे काम सुरू आहे . अनेक लोक सुमारे तीन फूट खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पडून जखमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे .वाहतुकीच्या कोंडीमुळे चौकात एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता आहे .तरी सदर काम लवकरात लवकर युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी वाहन चालकांनी मधून होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button