बार्शीमनोरंजन

बटरफ्लायचं स्पेशल स्क्रिनिंग, IAS घोलप यांच्याहस्ते शॉर्टफिल्मचे पोस्टर प्रकाशन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : नव्या पिढीला नव्या माध्यमातून संस्कार पेरण्याचं नवं माध्यम या बटरफ्लाय टीम ने सुंदर हाताळले असून चांगला संदेश देण्यात या शॉर्टफिल्म ची टीम यशस्वी झाल्याचे गौरोवद्गार जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी काढले. रामचंद्र इकारे लिखित, दिग्दर्शित ‘बटरफ्लाय’ हा लघुचित्रपट आजच्या पिढीवर भाष्य करीत असून हा लघुचित्रपट अनेक बाबींनी चांगला झाला असे प्रतिपादन रमेश घोलप यांनी केले.यावेळी या लघुचित्रपटाच्या पोस्टर चे प्रकाशन रमेश घोलप यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लेखक,दिग्दर्शक रामचंद्र इकारे, अभिनेते पांडुरंग फपाळ,अतुल लोखंडे उमेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोलप, विशाल गायकवाड, दिनेश घोलप आदींसह ऋत ची टीम उपस्थित होती. या लघु चित्रपटाचे चित्रण व संकलन (एडिटिंग) तन्मय इकारे यांनी केले असून पोस्टर डिझाइन हर्षद लोहार, पार्श्वसंगीत व ध्वनिमुद्रण जमीर कुरेशी ,सहाय्यक दिग्दर्शन डॉ विनोद भालेराव,पार्श्वगायन निहाल शेख यांनी तर यात पांडुरंग फपाळ,समर्थ सोनवणे,स्वराज लंगोटे,अविरत फपाळ,आदी कलाकारांनी भूमिका केल्या आहेत यातील तांत्रिक बाजू प्रवीण पावले,महेंद्र कुलकर्णी यांनी सांभाळली तर या लघुचित्रपटाच्या निर्मात्या स्वाती इकारे,ऋचा इकारे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button