निवेदनबार्शीमहाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर वर कठोर कारवाई करा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरले. याचा तीव्र जाहीर निषेध करत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार बार्शी यांना कारवाई चे निवेदन देण्यात आले. राहुल सोलापूरकर यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करा अन्यथा तीव्र रास्ता रोको आंदोलन असा ईशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव शिरीष ताटे, शहराध्यक्ष मुज्जमिल पठाण, प्रेम शेंडेगे, निलेश मुद्दे, आतिश गायकवाड, नवाज मुलाणी, यशवंत जाधव, अमर पाटील, समाधान पवार, फैजान सौदागर आदी पदाधिकारी उपस्थित होते.



