बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे शिवजयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज दिनांक 7/2/2025 रोजी बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकी मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल व बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी शिवजयंती उत्सव साजरा करताना शासनाच्या नियम व अटी बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तसेच 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त बार्शी शहरात अवैद्यरित्या विक्री होत असलेल्या दारूवर कडक कारवाई करण्यासाठी तीन फथक तयार करण्यात येणार असून दारू विक्री करणाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शिवजयंती निमित्त शहरात लावण्यात येणारे डिजिटल बॅनर हे देखील ठरवून दिलेल्या जागेतच व नगरपालिकेची परवानगी घेऊनच लावावेत. तसेच मंडप व लाऊड स्पीकर साठी प्रशासनाची परवानगी घेण्याच्या सूचना मंडळ व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. यावेळी बैठकीसाठी उपस्थितांची व अधिकाऱ्यांची विविध विषयावर चर्चा होऊन, बैठक शांततापूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
याप्रसंगी बार्शी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी विठ्ठल पाटोळे, महावितरण चे अधिकारी तसेच बार्शी शहरातील विविध मंडळ, संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.