राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश व शिवक्रांती प्रतिष्ठान च्या वतीने सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश व शिवक्रांती प्रतिष्ठान, बार्शी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 2 या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार नाना गव्हाणे यांच्या शुभहस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत, वंचित घटकतील शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आल्याचे शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष ताटे यांनी यावेळी बोलताना म्हटले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजम्मील पठाण, अमर पाटील, जिल्हा सरचिटणीस नवाज मुलांनी, समाधान पवार, प्रेम शेंडगे, Adv. सुदर्शन सोनवणे, फैजान सौदागर, आवेश भुमकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.