बार्शी

मोठी स्वप्ने पहा अन् ती सत्यात उतरवा

वैराग प्रतिनिधी / गौतम नागटिळक

वैराग – शिक्षणामुळेच परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्ने बघा, त्या स्वप्नांचा पाठलाग करा, ती मोठी स्वप्ने सत्यात उतरवा, तरचं जीवनात यश मिळेल, असे प्रतिपादन पुरातन शास्त्र विभागाचे अभ्यासक तथा लेखक विष्णू तुपे यांनी केले. बार्शी तालुक्यातील सासुरे येथे श्री महांकाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने श्री महांकाळेश्वर मंदिरात आयोजित दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांंच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबिका योगाश्रम वैराग शाखेचे संचालक दतात्रय उंडाळे हे होते. यावेळी दहावी परीक्षेत यश मिळविलेल्या जीवन विकास प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी ऋतुजा मोरे, देवश्री ताकभाते, अमृता आवारे, विनय दळवी यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे पालक श्रीहरी मोरे, हर्षदा ताकभाते, अनिल आवारे, वालचंद दळवी यांचा फेटा बांधून, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात श्री महांकाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त महादेव करंडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व पुढील काळातही त्यांनी या कार्यक्रामातून प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने ट्रस्टने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. कार्यक्रमास सरपंच तात्यासाहेब करंडे, अध्यक्ष भाऊसाहेब आवारे, सचिव हनुमंत आवारे, प्रशांत भारती, ह.भ.प. कुमार महाराज दळवी, दीपक पाटील, धनंजय दळवी, विवेक ताकभाते, सुनील पाटील आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात उंडाळे यांनी विद्याथ्यार्र्ंनी वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करावे, असे सांगितले. यावेळी सरपंच तात्यासाहेब करंडे, सज्जन दळवी आदींनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन महादेव आवारे यांनी केले. आभार रामचंद्र आवारे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button