निवडबार्शीमहाराष्ट्र

युवासेनेच्या उपजिल्हा युवा अधिकारीपदी गणेश लंगोटे यांची नियुक्ती

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

या नियुक्त्यांमध्ये बार्शी विधानसभा मतदारसंघातील गूळपोळी येथील गणेश लंगोटे यांची बार्शी ग्रामीण विभागाच्या उपजिल्हा युवा अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बार्शी तालुक्यातील युवासेना संघटनेला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

नियुक्तीनंतर गणेश लंगोटे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करत ग्रामीण भागातील युवकांना संघटित करण्यासाठी तसेच जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.500प्रमुख उद्दिष्टे : ग्रामीण भागातील युवकांना संघटित करून शिवसेनेची विचारधारा प्रभावीपणे पोहोचवणे. शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी अधिक तीव्र लढा उभारणे. प्रत्येक गावात युवासेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनहिताची कामे आणि संघटन विस्तारासाठी सक्रियपणे कार्य करणे.

या नियुक्तीमुळे बार्शी ग्रामीण भागातील युवासेना संघटनेला अधिक बळ मिळणार असून आगामी काळात संघटन विस्तार आणि जनसंपर्क अभियानाला गती मिळेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button