प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गुळपोळीच्या ज्योतिराम शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेत प्राथमिक शिक्षकपदी निवड

0

कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मिळवले यश; ग्रामस्थांकडून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : बार्शी तालुक्यातील मौजे गुळपोळी येथील सुपुत्र ज्योतिराम ज्ञानदेव शिंदे यांची रयत शिक्षण संस्था, सातारा येथे प्राथमिक शिक्षक पदावर निवड झाली आहे. ही निवड पवित्र पोर्टल मार्फत पारदर्शक पद्धतीने झाल्याने गुळपोळी गावासह संपूर्ण बार्शी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ज्योतिराम शिंदे यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुळपोळी, माध्यमिक शिक्षण भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, गुळपोळी, उच्च माध्यमिक शिक्षण ॲड. दिलीपराव सोपल विद्यालय, सुर्डी येथे पूर्ण केले. त्यानंतर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी येथून शिक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण पूर्ण केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता सातत्याने परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून विविध ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.500यावेळी युवा नेते धनंजय बावणे, ॲड. सत्पाल नरखडे, गणेश सुतार, नागेश शिंदे, आकाश बावणे, आनंद बावणे, अक्षय सावंत, प्रवीण गोसावी, लखन काशीद, दत्तात्रय चिकणे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ज्योतिराम शिंदे यांच्या निवडीबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक आणि शुभचिंतकांनी फोन, संदेश (SMS) तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

प्रेरणादायी संदेश
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी कष्ट, संयम आणि जिद्द असेल तर यश नक्की मिळते,” हे ज्योतिराम शिंदे यांच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या