बार्शीतील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत करडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले, तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडणारे, दैनिक दिव्य मराठीचे बार्शी वार्ताहार चंद्रकांत करडे यांचा कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने कै. शिवशंकर (बप्पा) घोंगडे जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. एनडीटिव्ही च्या असोसिएट एडिटर डॉ.कविता राणे, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, माध्यम व जनसंपर्क तज्ञ सचिन साळुंखे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी प्राचार्य डॉ. अशोक दादा मोहेकर, धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, दैनिक लोकमतचे वृत्त संपादक धर्मराज हल्लाळे, कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, विश्वस्त सतीश टोणगे, बालाजी अडसूळ, शितलकुमार घोंगडे यांच्यासह कळंब तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पुरस्कार स्वीकारताना करडे यांच्यासमवेत प्रगतशील शेतकरी बाबा मुकटे, जेष्ठ बंधू विक्रमनाना, पत्रकार मित्र गणेश गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

“पत्रकारितेच्या या २० वर्षांच्या वाटचालीत या क्षेत्राची प्रामाणिकपणे व नि:स्वार्थपणे सेवा करत आलो आहे आणि त्याच निस्वार्थी कार्याचे हे फळ आहे. आजवर बार्शीतील विविध संस्था, संघटनांच्यावतीने गौरविण्यात आले आहे. या सर्वांबद्दल माझ्या मनात प्रेम, आपुलकी तर आहेच आणि कळंब तालुक्यात माझे आजोळ आहे”. स्वातंत्र्य सेनानी कै शिवशंकर (बप्पा ) घोंगडे यांच्या नावाने असलेला व आजोळचा पुरस्कार म्हणून या पुरस्कारास एक वेगळी आत्मीयता व आपुलकी असून कळंब तालुका पत्रकार संघाने या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल कळंब पत्रकार संघाचा व घोंगडे परिवाराचे ऋण व्यक्त करत, या पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली असल्याचे चंद्रकांत करडे यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या