महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : अतुल राजेंद्र भोसले याचे विरूद्ध पीडित महिलेच्या फिर्यादीवरून बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे भा. द. वि. कलम ३७६, ५०४ व ५०६ या कलमान्वये दिनांक १२ मे २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर बार्शी येथील मे. जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश यांनी यातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

पिडीत महिला ही तीच्या मुलीसह १० मे २०२४ रोजी दुपारी १२ च्या सुमारास रस्तापुर येथील एका शेतात शेळया चारणे करीता गेली असता, आंब्याचे झाडाखाली पिडीत फिर्यादी ही एकटीच विश्रांती करत होती. आरोपीने तिथे येवुन पिडीतास दमदाटी शिवीगाळी करून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले व याबाबत कुणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद पिडीतेने बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली होती.
याप्रकरणी तपास पूर्ण करून पोलीसांनी आरोपी विरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

सदर खटल्याची सुनावणी बार्शी येथील मे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्यासमोर झाली. सदर प्रकरणात झालेल्या सुनावणी व अंतिम युक्ति वादानंतर बार्शी येथील मे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मे. एल. एस. चव्हाण. यांनी सबळ पुराव्या अभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपी अतुल भोसले याचे वतीने ॲड. प्रशांत एडके, ॲड. सुहास कांबळे, ॲड. समाधान सुरवसे, ॲड. आकाश तावडे यांनी काम पाहिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या