सुयश विद्यालय बार्शी मध्ये सुयश सृजन वार्षिक स्नेहसंमेलनाचे दुसरे पर्व उत्साहात संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : प्रशालेचे संस्थापक नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सलग चार दिवस अत्यंत उत्साहात पार पडला.चालू शैक्षणिक वर्षात डिसेंबर अखेरपर्यंत वार्षिक स्नेहसंमेलन होणार या बातमीनेच जणू सर्वांना स्फूर्ती मिळाली होती; सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अभ्यासाचा तोल सांभाळत विद्यार्थ्यांना आपले सुप्त गुण जागृत करण्याची जणू एक छान संधीच मिळाली होती. आपले सादरीकरण कसे उत्कृष्ट होईल या दृष्टीने सर्व विद्यार्थी उत्तम सराव करू लागले होते. अखेर दिनांक 26 ते 29 डिसेंबर या कालावधी स्नेहसंमेलनाचा निश्चित झाला. प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळावी म्हणून हा कार्यक्रम चार दिवस घेण्यात आला.

प्रत्येक दिवशी नवीन पाहुण्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा आरंभ झाला. साहेबांनी सुयश विद्यालयाची गुणवत्ता, क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम, व ‘जाऊ तेथे जिंकून येऊ’ या युक्तीची थोडक्यात प्रस्तावना केली.

या बालकलाकारांनी सिनेसृष्टीतील कलावंताला लाजवेल असे उत्कृष्ट सादरीकरण केले. या चिमुकल्यांनी भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास व आधुनिक युगाचे दर्शन आपल्या कलाकृतीतून सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक विद्यार्थ्यांचा उत्साह अगदी शेवटच्या गाण्यापर्यंत टिकून होता. प्रत्येक विद्यार्थ्याला आणखी स्फूर्ती मिळावी म्हणून क्रमांक काढण्यात आले. विजेत्या ग्रुपला उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल प्रसाद नलवडे व सौ. प्रियंका मॅडम यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भविष्यामध्ये सुयश मधून सुसंस्कारक्षम पिढी व चांगले अधिकारी घडतील अशी आशा व्यक्त केली. असा हा चार दिवसीय स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम, शिस्तबद्ध, नियोजनबद्ध व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी संस्थेचे संस्थापक मा. नलवडे साहेब मार्गदर्शिका सौ. प्रतिभा नलवडे मॅडम मार्गदर्शक प्रसाद नलवडे साहेब व सौ. प्रियंका मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक मंडलिक सर, सर्व पर्यवेक्षिका, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे प्रयत्न व पालकांचे सहकार्य यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी सूत्रसंचालनाची धुरा कर्ण मधुर आवाजात सौ. जगताप मॅडम साखरे मॅडम यांनी उत्कृष्टपणे पार पाडली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या