महाराष्ट्रमुंबई

ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

मुंबई,दि.२६ : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे शिवचरित्राचा आणि मराठा इतिहासाचा वस्तुनिष्ठ मागोवा घेणारा एक व्यासंगी संशोधक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.5000डॉ. जयसिंगराव पवार यांनी आयुष्यभर महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडण्याचे काम केले. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर त्यांनी केलेले संशोधन मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या निधनामुळे ऐतिहासिक संशोधन क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.5000डॉ. जयसिंगराव पवार यांनी केवळ इतिहास लिहिला नाही, तर तो पुराव्यांच्या आधारे जनमानसात रुजवला. कोल्हापूरच्या मातीत राहून त्यांनी शिवकाल आणि शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जागतिक पातळीवर नेला. त्यांच्या लेखणीत एक वेगळीच धार आणि सत्याचा आग्रह होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत योगदान देणारा एक दीपस्तंभ गमावल्याचे आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button