महाराष्ट्रसोलापूर

यावली येथील सालगुडे यांच्या सोनाई दुध डेअरी ला आग लागून सुमारे 55 लाखांचे नुकसान

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : बार्शी तालुक्यातील यावली येथे मोठ्या जिद्दीने आणि कष्टातून उभा केलेल्या युवा उद्योजक रामदास हरिदास सालगुडे यांच्या सोनाई दुध डेअरी व सालगुडे आईस्क्रीम ला शॉर्ट सर्किट मुळे आग लागून दुध शीतकरण मशीन, कुल्फी बनवण्याचे मशीन, दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचे मशीन,शीतगृह तसेच पशुखाद्य व इतर मशनरी आणि शेड चे जळून खाक होऊन पुर्ण पणे नुकसान झाले आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे सालगुडे परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

अन्गिशामक दलाचा गाडीला आग विजवण्यासाठी तब्बल 1 तास लागले एवढी भयानक आग होती यात सालगुडे यांचे मोठे नुकसान झालेच परंतु सोबत शेजारी असणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या झोपड्याही जळून खाक झाल्या आहेत. गावाकऱ्यांकडून या घटनेची हळ हळ व्यक्त होत असून सालगुडे यांना प्रशासनाकडून मदतीची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button