बार्शीमहाराष्ट्र

श्री शिवाजी महाविद्यालयाचे मल्लखांब स्पर्धेत यश : मुलींच्या संघाने पटकाला प्रथम क्रमांक

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आंतर महाविद्यालयीन मल्लखांब स्पर्धा के.एन.भिसे महाविद्यालय, कुर्डूवाडी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये श्री शिवाजी महाविद्यालय,बार्शीच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला तर मुलाच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.विजयी संघ सिद्धी मस्के,आरती हातमोडे,अल्फिया शेख,साक्षी जाधव, आलिशा मुलाणी यांचा समावेश होता. तर मुलांच्या संघामध्ये प्रशांत चव्हाण, अभिजीत जाधव, प्रवीण जाधवर, अजय आदलिंगे, रोहन काटमोरे, अनंत जोडगे यांचा समावेश होता.

या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय यादव,उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी.टी.पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे,कार्यकारणी सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए.बी. शेख, प्रमोद जाधव,संतोष कवडे, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विजय संघास शारीरिक शिक्षण संचालक डॉ. हरिदास बारसकर,डाॅ. विजयानंद निंबाळकर,डॉ. रामहरी नागटिळक,प्रा. संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button