निवेदनमहाराष्ट्रसोलापूर

सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या रस्त्याचे काम तातडीने हाती घेणेबाबत सो.म.पा. मा. आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा )चंदनशिवे यांनी दिले निवेदन

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सम्राट चौक ते जुना कारंबा नाकापर्यंतचा हा सदरचा रस्ता प्रचंड रहदारीचा असून सदरच्या ह्या रस्त्यावर एसटी महामंडळाच्या सोलापूर शहरातून बाहेर पडणाऱ्या संपूर्ण बसेस ह्या रस्त्याचा वापर करतात. सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या रस्त्याकडे जड वाहतूक प्रचंड प्रमाणात होत असल्याने सदरच्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले नसल्याने हा रस्ता कमकुवत झाला आहे सदरचा हा रस्ता बुधवार पेठ परिसरातील 15 ते अधिक शाळा कॉलेज महाविद्यालय व उत्तर तालुक्यातील 22 गावांना जोडला असून मोठ्या प्रमाणावर नागरिक हा रस्त्याचा वापर करतात.

मार्केट यार्ड व बाजारपेठेकडे जाण्यासाठी प्रमुख रस्ता म्हणून ह्या रस्त्याचा वापर होत असून सदरच्या ह्या रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग राहतो. झोपडपट्टीतील नागरिकांना रस्ता खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात याचा त्रास होत असून सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या रस्त्याला पिण्याच्या पाण्याची लाईन व पावसाळी पाण्याचा मोठा प्रमाणात निचरा होत असतो. त्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रचंड वाहतुकीमुळे या रस्त्याची ड्रेनेज लाईन सातत्याने फुटत असते. या भागात श्री प्रभाकर महाराज मंदिर, जैन धर्माचे जैन मंदिर व सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांनी स्थापन केलेले काही लिंग या परिसरात आहेत. यामुळे या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे ह्या रस्त्याला प्रचंड अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत.

यास्तव सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या रस्त्याचे काम तातडीने हाती घेणेबाबत संबंधित विभागास आदेश व्हावे असे निवेदन सो.म.पा. मा. आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे यांनी दिले. यावेळी सो. म.पा.मा. नगरसेवक गणेश पुजारी, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते गौतम नागटिळक, भीमा मस्के इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button