धाराशिवप्रशासनमहाराष्ट्र

रोजगार व उद्योग क्षेत्राच्या व्यापक सर्वेक्षणाचा शुभारंभ नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे : जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

धाराशिव,दि.१२ जून : देशातील रोजगार,बेरोजगारी तसेच असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey-PLFS) 2026 आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (Annual Survey of Unincorporated Sector Enterprises-ASUSE) 2026 राबविण्यात येत आहे.या महत्त्वपूर्ण सर्वेक्षण उपक्रमाचा शुभारंभ आज १२ जून रोजी शुक्रवारी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आला.

या सर्वेक्षणांच्या माध्यमातून देशातील रोजगार, बेरोजगारी, स्वयंरोजगार,उद्योग-व्यवसाय आणि असंघटित क्षेत्रातील आर्थिक घडामोडींची अचूक माहिती संकलित केली जाणार आहे.केंद्र व राज्य शासनाच्या विविध धोरणांच्या आखणीसाठी तसेच रोजगार निर्मिती व उद्योगविकासाशी संबंधित निर्णय प्रक्रियेसाठी या सर्वेक्षणातील माहिती महत्त्वाची ठरणार आहे.5000यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, सर्वेक्षणासाठी भेट देणाऱ्या अधिकृत कर्मचाऱ्यांना आवश्यक ती माहिती प्रामाणिकपणे व अचूकपणे उपलब्ध करून द्यावी.नागरिकांच्या सहकार्यामुळेच रोजगार व उद्योग क्षेत्राचे वास्तव चित्र समोर येण्यास मदत होणार असून विकासाभिमुख धोरणे अधिक परिणामकारकपणे राबविता येतील.

या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे,जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक सुधाकर जाधव तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय आणि जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button