निवडणूकबार्शीमहाराष्ट्र

मी, बार्शी विधानसभा मतदारसंघ निवडणूक रिंगणात नाही!

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : मराठा समाजसेवक मनोजदादा जरांगे-पाटील यांच्या गोटातून बार्शी विधानसभा मतदारसंघातून जरांगे-पाटलांचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची चर्चा पुढे आल्याने महाराष्ट्रातील एक संवेदनशील संपादक म्हणून मी त्यावर विचारपूर्वक भूमिका घेतली. माझे जन्मगाव असलेल्या आणि विविध चळवळी व जातीधर्मांशी माझा थेट संबंध असलेल्या बार्शी तालुक्याच्या जनमानसाचा मी कानोसा घेतला. त्यासाठी एका प्रोफेशनल एजन्सीकडून मतदार सर्वेक्षणही करुन घेतले.त्यानंतर बार्शी विधानसभा निवडणुकीत लढण्यास अनुकूल वातावरण असल्याचे मला संकेत मिळाले.सोलापूर जिल्ह्याच्या सकल मराठा ट्रस्टचा मी एक ट्रस्टी असल्याने मराठा समाजाची बार्शी मतदारसंघासंदर्भातील मानसिकता जाणून घेतल्यानंतर “मनोजदादा जरांगे-पाटील यांनी त्यांचा उमेदवार म्हणून लढण्याचा आदेश दिल्यास मी लढण्यास तयार आहे”,अशी भूमिका घेतली.

निवडणुकीसाठी राज्यभरातील इच्छुक उमेदवारांनी केल्या प्रमाणे इच्छुक म्हणून मी उमेदवारीची मागणी केली नव्हती अथवा त्यासाठी मुलाखतही दिली नव्हती.राजकारण हे माझे कार्यक्षेत्र नाही.त्या कारणाने थेट आंतरवाली सराटी येथे जावून मनोजदादांची भेट घेतली व माझी भूमिका त्यांच्या पुढे ठेवली ,”आपण सांगितल्यास मी बार्शीतून आपला उमेदवार म्हणून लढण्यास तयार आहे”,अशी निःसंदिग्ध ग्वाही मा.मनोजदादांना त्या भेटीत दिली. त्यावर दोन दिवसांत आपण निर्णय घेवू,असे त्यांनी सांगितले होते.

उद्या उमेदवारी दाखल करण्याची मुदत संपते आहे.मला अर्ज दाखल करण्याची मा.मनोजदादांची सूचना अद्याप आलेली नाही. त्यामुळे मी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. मी बार्शी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही, असे विनयपूर्वक जाहीर करतो. एक श्रमिक पत्रकार व संपादक म्हणून मनोजदादांच्या चळवळीत नेहमी प्रमाणे मी माझा खारीचा वाटा प्रामाणिकपणे उचलत राहीन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button