नंदुरबारनिवडणूकमहाराष्ट्र

ओळखपत्र नसल्यास इतर बारा पैकी कुठलाही एक पर्याय मतदानासाठी ग्राह्य धरणारडॉ. मित्ताली सेठी

B1न्यूज मराठी नेटवर्क

नंदुरबार :महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करताना मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. तसेच मतदार ओळखपत्र नसल्यास इतर बारा पैकी कुठलाही पर्याय ओळीखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

मतदार ओळखपत्र नसल्यास हे कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरणार..

  • आधारकार्ड.
  • मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉब कार्ड.
  • बँक किंवा पोस्ट ऑफीसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक.
  • कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड.
  • वाहन चालक परवाना.
  • पॅनकार्ड.
  • राष्ट्रीय जनरल ऑफ इंडिया यांचेद्वादा नॅशनल पॉप्युलेशन रजिष्टर अंतर्गत निर्गमित स्मार्टकार्ड.
  • भारतीय पासपोर्ट.
  • फोटोसह पेन्शन दस्तऐवज
  • केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक लिमिटेड कूपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र.
  • खासदार, आमदार यांना देण्यात आलेले ओळखपत्र यांचे अधिकृत ओळखपत्र व
  • भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांग प्रमाणपत्र
    यापैकी कोणताही एक पुरावा मतदान करतांना ग्राह्य धरण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button