बार्शीमनोरंजनमहाराष्ट्र

बार्शीमध्ये शंकरा आयडॉल स्पर्धा 2024 उत्साहात संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : नमो चषक व भीम टायगर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था बार्शी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शंकरा आयडॉल जिल्हास्तरीय स्पर्धा 2024 शंकर रेकॉर्डिंग स्टुडिओ अँड संगीत क्लासेस यांच्यावतीने घेण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी उद्घाटक मा. आमदार राजेंद्र राऊत तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोकगीताचे प्रसिद्ध चंदन जी कांबळे तसेच महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका निशा साबळे मॅडम शाहीर राजेश ननवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. नगराध्यक्ष असिफ भाई तांबोळी, मार्केट कमिटीचे चेअरमन मा. रणवीर भैय्या राऊत, डॉक्टर यादव साहेब, मा.विलास रेणके आप्पा, बाबासाहेब कापसे,अजितदादा बारंगुळे,संदेश काकडे,माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे श्रीधर कांबळे सर, दलित महासंघ जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे सर,शहराध्यक्ष संदीप आलाट सर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे राहुल भैया बोकेफोडे, पंकज पवार, अजय कदम,निलेश वाघमारे या कार्यकर्त्यांनी या स्पर्धा पार पाडल्या. तसेच गायन व डान्स स्पर्धेमध्ये एकूण 65 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी, पुणे मुंबई तसेच सातारा,बीड,सोलापूर,बार्शी,भूम वाशी या ठिकाणाहून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे :- गायन स्पर्धा प्रथम क्रमांक : स्तुती राजू लोखंडे व कौशल्य शशिकांत पवार
दुसरा क्रमांक :- पुनम वाळके व सोनू पवार
तिसरा क्रमांक :- मयंक जेगावकर व भारत माने
उत्तेजनार्थ क्रमांक :- कृष्णा काळे तसेच तेजस्विनी बनसोडे. डान्स स्पर्धा प्रथम क्रमांक :- स्नेहल विधाते व आर. एस अकॅडमी, बार्शी
द्वितीय क्रमांक ऐश्वर्या लोंढे व जिजामाता विद्यामंदिर बार्शी, तृतीय क्रमांक :- सायली सावंत व शिव डान्स अकॅडमी बार्शी.
उत्तेजनार्थ क्रमांक : द्वितीय विशाल मांगडे व आराध्या पाटील या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले मान्यवर श्री.निहाल शेख सर तसेच श्री. साजिद बागवान सर या दोघांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.या स्पर्धेचे सर्व रेकॉर्डिंग ज्यांना कुणाला पाहिजे आहे त्यांनी युट्युबवर शंकरा म्युझिकल चैनल, बार्शी या वरती जाऊन कार्यक्रम पाहू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button