बार्शीमहाराष्ट्रसामाजिक

महामानव संस्थेच्या वतीने अशोक नागटिळक यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्रामला शैक्षणिक साहित्य, फळे , किराणा – धान्याची मदत , महामानव संस्थेचा सामाजिक उपक्रम

अजित फाऊंडेशन संचिलत स्नेहग्राम विद्यालयला महामानव संस्थेकडून शैक्षणिक साहित्य, फळे , किराणा – धान्याची मदत

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील रातंजन येथील मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त अजित फाऊंडेशन संचालित स्नेहग्राम विद्यालय कोरफळे येथे तीन वर्षांपासून मुलांना शैक्षणिक साहित्य किराणा, धान्य व खाऊ फळे वाटप करुन वाढदिवस सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा केला जातो . त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमांतून संस्थेने सामाजिक दातृत्व जपले. अजित फाऊंडेशन संस्थचे संस्थापक अध्यक्ष महेश निंबाळकर , सौ. विनय निंबाळकर हे स्नेहग्राम विद्यालयचे काम पाहता.

अशोक नागटिळक महाराज यांनी समाजातील वंचित मुलांना मायेला ओलावा मिळावा, भूकेचा प्रश्न लक्षात घेऊन स्नेहग्रामला ही मदत दिल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उर्मिला काकी देशमुख प्रमुख पाहुणे बापू नागटिळक तर महादेव कटकर गणेश लंगोटे हे प्रमुख उपस्थिती होते.

अशोक नागटिळक महाराज यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आला. यावेळी स्नेहग्रामच्या मुलांना अशोक नागटिळक यांचे अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी मानवता बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव बापू नागटिळक, उपाध्यक्ष गौतम नागटिळक, महामानव बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, किरण खुरंगळे , निलेश गिराम , गणेश लंगोटे , श्याम जाधव, किरण डोलारे , अभिराज नागटिळक , ज्ञानेश्वर चव्हाण , अभय हिवरे, ओंकार कांबळे, दिपक डीगे, विष्णू शिंदे, संजय जाधव, सूरज रसाळ, अरविंद आतकरे, सनी काळे, राजेश स्वामी, सारिका स्वामी आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे कार्यक्रम आयोजन महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना भैरवनाथ चौधरी, सूत्रसंचालन गौतम नागटिळक तर आभार प्रदर्शन किरण खुरंगळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button