तंबाखूमुक्त अभियानात श्री बबनराव शिंदे माध्यमिक विद्यालय, सौन्दरे केंद्रात पहिली

0

B1न्युज नेटवर्क

बार्शी : तंबाखूमुक्त अभियानात श्री बबनराव शिंदे माध्यमिक विद्यालय, शेलगाव (मा) सौन्दरे केंद्रात पहिली तंबाखू मुक्त शाळा झाली.भारत सरकारच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधरित ९ निकषाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने बार्शी तालुक्यातील श्री बबनराव शिंदे माध्यमिक विद्यालय, शेलगाव(मा) २०२१-२०२३ या शैक्षणिक वर्षात तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे. आरोग्य विभागाने पारित केलेले सुधारीत नऊ निकष हे तंबाखू मुक्त व आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारीत नऊ निकषांना पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड , रामचंद्र वाघमारे केंद्र समन्वयक विवेकानंद जगदाळे (मुख्याध्यापक शाळा. नागोबाचीवाडी) सौन्दरे केंद्राचे केंद्रप्रमुख बाळपुरी यांचे संपूर्ण मार्गदर्शन लाभले. श्री बबनराव शिंदे माध्यमिक विद्यालय शेलगाव (मा) सौन्दरे केंद्रात पहिली तंबाखू मुक्त झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी साधना काकडे , शिक्षण विस्तार अधिकारी एल एस जाधव , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मनीषा मारकड यांनी सर्वांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक धनंजय चिकणे शाळेतील नोडल शिक्षक बालाजी कदम , सादिक मोगल, शुभांगी देवकते, विजय घळके, कैलास ठोंबरे, बाळू चिकणे यांनी नवीन निकषानुसार तंबाखू मुक्त शाळा केंद्रामध्ये पहिली केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या