बार्शीमहाराष्ट्रसामाजिक

लायंस क्लब बार्शी रॉयल चा अनोखा उपक्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : निसर्गाचा दुष्ट चक्रात सापडलेल्या शेतकर्या साठी एक हात मदतीचा म्हणून आज लायंस क्लब बार्शी रॉयल ने व तिरुपती एग्रो बार्शी व स्वरा सम्रुध्दी सीड्स यांच्या संयुक्त रितेने बार्शी तालुक्यातील गरजू ५० शेतकऱ्या ना मोफत स्वरा सम्रुध्दी सीड्सचे कांदा बियाण्याचे वाटप केले. सध्या महाराष्ट्रात दुष्काळी परीस्थीती निर्माण झाली आसून बार्शी तालूक्यात पेरणी योग्य पाऊस झालेला नाही, शेती मालाला बाजार भाव नसल्याने बळीराज खूपच अडचणीत आला आहे.

काळ्या आईची सेवा करणाऱ्या बळीराजाला काही तरी मदत व्हावी म्हणून लायन्स क्लब बार्शी रॉयल व तिरूपती एग्रो बार्शी यांच्या माध्यमातून कांदा बियाण्यात नामांकित कंपनी स्वरा सम्रुध्दी सिडस कंपपनीच्या सहकार्याने बियाण्याचे वाटप केले व कांदा लागवडी बाबत बागूल यांनी शेतकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पंचायत समीतीचे कृषि अधिकारी आंधारे क्लब चे नुतन अध्यक्ष ला, राजेश खाडे सेक्रेटरी ला, मनिष रुगले खजिनदार ला शशिकांत बारबोले माझी प्रांतपाल ला जितेंद्र दोशी ला रिजन चेअरमन अमर काळे ला सुनिल पाटील,ला राहूल माढेकर ला मनोज पाटील ला महावीर शहा तिरूपती एग्रो चे संचालक ला मंगेश बागुल तिरूपती एग्रो चे संचालक सचीन चव्हाण व तिरूपती एग्रो चे संचालक शिवाजी खळदकर व सर्व तिरुपती एग्रो चा स्टाप उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button