प्रा. डॉ. दिलीप कराड यांना रेड क्रॉसचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : प्रा.डॉ.दिलीप कराड यांना रेड क्रॉस तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. तसे पत्र इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे राष्ट्रीय मुख्यालय दिल्लीचे सेक्रटरी जनरल आर.के. जैन यांनी दिले आहे.

सदरचा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दि.17 जुलै रोजी नवी दिल्ली येथे राष्टपती भवनात होणार आहे. केंद्रीय आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्री व रेड क्रॉसचे चेअरमण डॉ.मनसुख मांडविय यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

प्रा. डॉ. दिलीप कराड हे सध्या रेड क्रॉस सोसायटी, शाखा बार्शी संचलित श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. स्व. डॉ.द.ग. कश्यपी , स्व डॉ.काका सामनगावकर यांच्या प्रेरणेतून गेल्या अनेक वर्षापासून प्रा.दिलीप कराड हे बार्शी रेड क्रॉस चे सदस्य आहेत. ते स्वःता शतकवीर रक्तदाते आहेत. व त्यांनी गेल्या अनेक वर्ष रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. विविध आंतराष्ट्रीय प्रकल्पामध्ये सहभाग, करोना महामारी मध्ये सक्रिय सहभाग, प्रथमोपचार शिबीरांचे आयोजन, एच.आय.व्ही. एडस वरील संशोधन, राज्य स्तरीय व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद संघातील सहभाग, कर्नाटक,महाराष्ट्र राज्यतील पुर परिस्थीतीत सहभाग इ. गोष्टींचा पुरस्कार देतांना विचार करण्यात आला.

बार्शी रेड क्रॉस चे मानद सचिव अजित कुंकूलोळ तसेच उपाध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, अशोक डहाळे , डॉ ,विक्रम निमकर ,सुभाष जवळेकर,प्रताप जगदाळे, संतोष सुर्यवंशी , डॉ.रामचंद्र जगताप यांनी अभिनंदन केले. श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी चे प्राचार्य डॉ.अब्दुल शेख व इतर प्राध्यपकानी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या