न्यायालयीन व्यवस्थेत लघुलेखकांचे मोठे योगदान प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ.शब्बीर औटी.

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : न्यायालयीन व्यवस्थेत लघुलेखक यांचे मोठे योगदान आहे. न्याय व्यवस्थेत काम करताना समाजाला न्याय देताना न्यायालयातील प्रतेक घटकाने आपलेआपले काम व्यवस्थित व वेळेत केल्यास समाजाला वेळेत v जलद न्याय मिळेल असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ.शब्बीर औटी यांनी केले.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ.शब्बीर औटी हे सोलापूर जिल्हा लघुलेखक संघटनेच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधक पल्लवी पैठणकर, लघुलेखक संघटनेचे संस्थापक सिध्देश्वर कुर्ले, संघटनेचे अध्यक्ष परशुराम कानकी, लघुलेखक रज्यासंघतनेचे प्रतिनिधी बी बी सलवदे आदी उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ.शब्बीर औटी म्हणाले की लघुलेखक यांनी त्यांच्या शब्दाचे भांडार वाढवले पाहिजे. त्यासाठी जास्तीतजास्त वाचन केले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या कामात अचूकता निर्माण केली पाहिजे.
त्याचबरोबर प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ.शब्बीर औटी यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष सांगून वयाच्या १८ वर्षा पर्यंत अपंगत्वामुळे एकही दिवस शाळेत न जाता घरी बसून शिक्षण घेतले. योग्य शिक्षण व कष्ट करण्याची तयारी असल्यास तुम्हाला प्रगती पासून कोणतीही परिस्थिती थांबाऊ शकत नाही असे सांगितले. यावेळी नवनियुक्त लघुलेखकांचा प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ.शब्बीर औटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रासताविक सिध्देश्वर कुर्ले यांनी केले. सुत्रसंचलन संतोष घोंगडे यांनी तर आभार समिना शेख यांनी मानले.