बार्शी

भव्य दिव्य 65 फूटी शिवध्यज साकत विद्यानगर येथे उभा तब्बल दोन महिने स्वराज्य प्रतिष्ठानच्या मावळ्यानी घेतले परिश्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी तालुक्यातील साकत विद्यानगर येथे छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेची पूजा करून हा शिवध्वज फडकवण्यात आला . शिवजयंती निमित्त 65 फूट उंचीचा चा शिवध्वज तर त्याची पथका १५ फूट रुंद व १० फूट लांब असा हा शिवध्वज उभा करण्यात आला तसेच हा शिवध्वज उभा करण्यासाठी तबबल दोन महिने परिश्रम घेतले. तसेच यासाठी अंदाजीत रककम ७० हजार रुपये खर्च आला. तसेच याला अजून शुशोभित करण्यासाठी अंदाजे रककम ५० हजार लागण्याची शक्यता स्वराज्य प्रतिष्ठान मंडळाच्या आयोजकानी यावेळी सांगितले . शिवजयंती निमित्त शिवभोजनाचे ही आयोजन करण्यात आले होते तसेच बापूसाहेब घोरपडे युवा मंच साकत यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 50 रक्तदात्यानी रक्तदान करण्यात आले .यामध्ये सर्व स्वराज्य प्रतिष्ठान च्या मावळ्यांनी या शिवध्वज साठी दोनमहिन्यापासून परिश्रम घेतले आणि आखेर हा शिवध्वज उभा झाला तसेच ग्रामपंचायात साकत येथे ही शिवजयंती साजरी करण्यात आली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button