“कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी येथे मोफत 120 अँजिओग्राफीचा चा संकल्पपूर्ती सोहळा”

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी :कोरोना नंतर (अलीकडच्या काळात) हृदय रोगाच्या समस्या चिंतेचा विषय ठरत आहे जगभरात एक तृतीयांश लोकांचा मृत्यू हृदयविकाराशी संबंधित आहे, काही वेळेस हृदयविकाराचे रुग्ण अंतिम टप्प्यात रुग्णालयात दाखल होतात या गोष्टी टाळण्यासाठी रुग्णाचे वेळी तपासणी, निदान करणे व औषधोपचार करणे महत्त्वाचे आहे. यासाठी अद्यावत यंत्रसामग्री, पूर्णवेळ तज्ञ डॉक्टर्स असणे गरजेचे आहे.
रुग्णांना बायपास सारख्या शस्त्रक्रिया टाळण्यासाठी व वेळीच म्हणजेच ‘गोल्डन आवर’ मध्ये त्वरित उपचार मिळवून प्राण वाचवण्याकरिता हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सारख्या सुविधा असणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या शहराकडे रुग्णून येण्याची गरज पडू नये म्हणून बार्शीसारख्या निमशहरी भागात या सर्व सुविधा जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक मशीन उपलब्ध असून पूर्णवेळ तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत.
या सर्व सुविधांचा अधिक अधिक रुग्णांना लाभ व्हावा या अनुषंगाने श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी व जगदाळे मामा हॉस्पिटल यांनी “कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त मोफत 120 अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला” या शिबिराचा कालावधी 27 फेब्रुवारी 2023 ते 6 मार्च 2023 मध्ये होता . यामध्ये जवळपास 253 लोकांनी नाव नोंदविले होते. डॉक्टरांनी गरजू , निर्धन व दुर्बल रुग्णांवर योग्य ते उपचार मोफत केले. अँजिओग्राफी व एन्जोप्लास्टी सोबतच ई.सी.जी. , टू-डी इको, रक्त तपासण्या व औषधे यादेखील सुविधा मोफत देण्यात आल्या.
हे महत्त्वाचे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जगदाळे मामा हॉस्पिटल मधील हृदयविकार तज्ञ डॉ. आदित्य साखरे ,यांचे सहकारी सर्व कन्सल्टंट, मेडिकल ऑफिसर, नर्सिंग स्टाफ व सर्व कर्मचारी वृंदां यांचे आभार.
मोफत 120 अँजिओग्राफी चा संकल्प पूर्ती सोहळ्यास प्रमुख पाहुणे मा. डॉ. डी. के. पाटील (जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर) यांनी संदेशाद्वारे शुभेच्छा पाठवल्या व आभार मानले . कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय.यादव (अध्यक्ष श्री शि. शि. प्र.मंडळ,बार्शी) तसेच डॉ. आदित्य साखरे ( हृदयरोग तज्ञ सुपर स्पेशलिस्ट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी विभाग प्रमुख) हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रिटेंडेंट डॉ. आर. व्ही. जगताप , कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किरण गाढवे, सौ रश्मी गव्हाणे यांनी केले.