आरोग्यबार्शी

आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नांना यश वैराग येथे ३० खाटाचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यास मान्यता

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील वैराग येथे प्रलंबित असलेल्या ३० खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाला शिंदे फडणवीस सरकारने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे वैराग भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू होता. गेल्या चार पाच महिन्यापूर्वी सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून डॉ. तानाजीराव सावंत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आमदार राजाभाऊ राऊत यांच्या निवेदनाची दखल घेत याला विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे.या दवाखान्यात जनरल वाॅर्ड, पुरूष महिला वाॅर्ड, सर्जिकल विभाग, ओपीडी, एक्सरे रूम, पॅथोलॉजी लॅब, ऑपरेशन थिएटर, मेडिकल स्टोर, क्रिटिकल केअर आदी सर्व सुविधा असणार आहेत. या रुग्णालयामुळे वैराग भाग व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. वैराग ग्रामीण रूग्णालयास विशेष बाब म्हणून मान्यता आणल्याबद्दल वैराग व वैराग भागातील नागरिकांनी आमदार राजाभाऊ राऊत आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button