अपघातपत्रकार विषयकबार्शीमहाराष्ट्र

पत्रकार वैशाली ढगे यांचा अपघात : अपघातात गंभीर जखमी, उपचार सुरू

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षा व रणरागिणी न्यूजच्या संपादिका वैशाली ढगे या लक्ष्याचीवाडी येथून स्कुटीवरून बार्शीकडे येत असताना आज सकाळी सुमारे 10.30 वाजता परंडा रोडवरील मधुबन नर्सरीजवळ बायपास चौकात भीषण अपघात झाला. ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या.

अपघातानंतर ढगे यांना तात्काळ बार्शी येथील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून येथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.

दोषी ट्रक ड्रायव्हर वर कठोर कारवाई करण्याची मागणी बार्शी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास बार्शी तालुका पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button