बार्शीशैक्षणिक

सुयश विद्यालय बार्शीच्या विद्यार्थ्यांचे इंग्लिश आणि सायन्स ओलंपियाड मध्ये घवघवीत यश

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सुयश विद्यालय बार्शी मध्ये नॅशनल सायन्स ओलंपियाड फाउंडेशन च्या वतीने घेण्यात येणाऱ्या ओलंपियाड परीक्षा राबविण्यात आल्या होत्या. यामध्ये इंग्लिश ओलंपियाड आणि सायन्स ओलंपियाड मध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केली आहे. इंग्लिश ओलंपियाड मध्ये एकूण 30 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल विथ डिस्टिंक्शन मिळवलेले आहे. तसेच सायन्स ओलंपियाड मध्ये 42 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवलेले आहे. सर्व विद्यार्थी दुसऱ्या लेव्हल साठी पात्र ठरलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयासाठी अर्चना घोलप , मीनाक्षी राऊत,वर्षा साखरे ,सुनीता शेटे व चेतन जाधव सर यांनी मार्गदर्शन केले होते. तसेच सायन्स या विषयासाठी पूजा राखुंडे, सुवर्णा मोरे व नम्रता जठार या शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते.सर्व विद्यार्थ्यांना मेडल देऊन तसेच प्रमाणपत्र देऊन संस्थेचे संस्थापक शिवदास नलवडे ,संस्थेच्या मार्गदर्शिका प्रतिभा नलवडे, प्रशालेचे मुख्याध्यापक सागर मंडलिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.नलवडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे या यश संपादनाबद्दल विशेष कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button