सेतू सुविधा केंद्र ठेक्याची मुदत समाप्त , महा ई सेवा केंद्रातून दाखले, सेवा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) चालविण्याकामी देण्यात आलेली ठेक्याची मुदत दि. 31 मार्च 2023 रोजी संपुष्टात आली आहे. जिल्हा सेतू समिती, सोलापूर यांच्यामार्फत सोलापूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा केंद्र) स्थापन करण्यात आलेली आहेत. ते सध्या कार्यरत आहेत. तरी यापुढे नागरिकांनी आपल्या रहिवाशी भागात कार्यरत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा केंद्र) मार्फत विविध दाखले व सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

पत्रकात म्हटले आहे, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकांना विविध शासकीय, निमशासकीय दाखले / सेवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन स्वरूपात त्यांच्या रहिवाशी भागात उपलब्ध करून देणेबाबत निर्देश प्राप्त आहेत. तसेच राज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 लागू झाला आहे. तथापि सदर अधिनियमांतर्गत विविध शासकीय / निमशासकीय विभागाने अधिसूचित केलेले दाखले / सेवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन स्वरूपात देण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) चालविण्याकामी देण्यात आलेली ठेक्याची मुदत दि. 31 मार्च 2023 रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील व 09 तहसिल कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) दि. 01 एप्रिल, 2023 रोजी पासून बंद करण्यात येत आहेत,

जिल्हा सेतू समिती, सोलापूर यांचे मार्फत सोलापूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र महा ई सेवा केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. ते सध्या कार्यरत आहेत. तरी यापुढे नागरिकांनी आपल्या रहिवाशी भागात कार्यरत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा केंद्र) मार्फत विविध दाखले व सेवा सुविधांचा लाभ घ्यावा. सोलापूर शहर व जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राची यादी सोलापूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर solapur.gov.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या