साकत येथे १ कोटी ४५ लाख रुपये मंजूर विविध विकास कामांचे उद्घाटन, व सत्कार समारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यात सर्वत्र विकासाची गंगा वाहत आहे.तालुक्यात आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्फत कोट्यावधींची विकासकामे चालु आहेत. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांच्या शुभहस्ते साकत येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी १४ लाख, आमदार निधीतून सभामंडपासाठी १५ लाख,दलित वस्ती योजनेअंतर्गत रोड व गटार करण्यासाठी ११ लाख,ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसवणे यासाठी ५ लाख मंजूर कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
साकत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाबासाहेब मोरे व व्हा.चेअरमनपदी नामदेव खटाळ यांची निवड झाल्याबद्दल सभापती रणवीर राऊत यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने ही कामे होत आहेत.गावच्या विकासासाठी यापुढेही नेहमीच आमचं सहकार्य राहील आसा विश्वास सभापती रणवीर राऊत यांनी ग्रामस्थांना दिला.
यावेळी सरपंच हरी विजय मोरे, उपसरपंच इरशाद इनामदार, विलास मोरे, महेश मोरे, सागर मोरे दादासाहेब मोरे, बापूसाहेब घोरपडे, रामभाऊ सपकाळ, बबन शिंदे, दत्तात्रेय खटाळ, प्रमोद खटाळ, धनाजी मोरे, दीपक मोरे, अशोक मोरे, दिगंबर मोरे, महादेव मोरे, सचिन मोरे, बप्पासाहेब निंबाळकर, दादासाहेब पाटील, दयानंद गाडे, पिंटू लोंढे, हनुमंत जाधव, विजय लोखंडे, तानाजी मोरे, पिंटू मोरे, आप्पासाहेब मोरे, महादेव खटाळ,सागर खटाळ, बाळासाहेब खताळ तसेच इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.