महाराष्ट्ररायगड

वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट (HSRP) बसविण्याकरितादि.30 जून पर्यंत मुदतवाढ

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

रायगड-अलिबाग, दि.21: परिवहन विभागामार्फत वाहनांना हाय सिक्युरीटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्याकरिता देण्यात आलेली मुदत नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्या दि.14 ऑगस्ट 2025 च्या परिपत्रकानुसार दि.30 जून 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल निलेश धोटे यांनी केले आहे.500
वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट (HSRP) बसविणे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असून वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करण्यासाठी वाहनांची ओळख पटवणे, नंबरप्लेट मध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने निदेश दिले असून या निर्देशांची अंमलबजावणी व नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दि.01 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
5000
ज्या वाहनधारकांची वाहने 01 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेली आहेत अशा सर्व वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या https: transport.maharashtra.gov.in, या संकेतस्थळावर जाऊन त्याबाबत नोंदणी करावी.

या कामासाठी परिवहन विभागाने अधिकृत कंपन्याची नेमणूक केली असून त्यांच्यामार्फतच हाय सिक्युरीटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. इतर अनधिकृत विक्रेत्यांकडून नंबरप्लेटची (HSRP) नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये नोंद होणार नाही. याविषयी काही शंका अथवा तक्रारी असल्यास परिवहन विभागाच्या पोर्टलवर अथवा dytccomp.tpt-mh@gov.in, या इमेल वर संपर्क साधावा.

तसेच नागरिकांच्या सोयीसाठी एका ठिकाणी किमान 25 किंवा 25 पेक्षा जास्त दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा, टक्सी, बस, ट्रक मालकांनी HSRP बसविण्यासाठी अर्ज केल्यास त्यांच्या सोयीच्या ठिकाणी किंवा हौसिंग सोसायटीमध्ये संबंधित एजन्सी मार्फत कोणतेही अतिरिक्त होम फिटमेंट शुल्क न आकारता HSRP बसविण्यात येईल.59000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button