न्याय विभागबार्शीमहाराष्ट्र

सरकारी रेशन तांदूळ घोटाळ्यातील आरोपीचा जामीन अर्ज मंजूर

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 232/2026 मधील आरोपी अक्षय राजाभाऊ बारसकर (रा. वैराग) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 316(5), 316(2), 3(5) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 चे कलम 3 व 7 अन्वये रेशन तांदूळ घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. राहुल अंकुश पाटील यांनी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज दाखल केला.500 जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान अ‍ॅड. पाटील यांनी बचाव पक्षाच्या वतीने सविस्तर युक्तिवाद करत आरोपीने तपासात पूर्ण सहकार्य केले असून, त्याचा गुन्ह्यात कोणताही प्रत्यक्ष सहभाग नाही. तसेच, फिर्यादीतील आरोपांच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली कलमे सदर आरोपीस लागू होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मा. रेवती बागडे यांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी अक्षय राजाभाऊ बारसकर यास योग्य त्या अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. राहुल अंकुश पाटील, अ‍ॅड. विवेक गजशिव व अ‍ॅड. विशाल चिपडे यांनी कामकाज पाहिले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button