आंदोलनबार्शी

अवकाळीन पावसाने मुंगशी परिसरातील ज्वारी झाली भुईसपाट

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : अचानक अवकाळी झालेल्या पावसाने तसेच वादळी वाऱ्याने बार्शी तालुक्यातील मुंगशी वा येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळीनं घेतल्याने शेतकरी मोठा हतबल झाला आहे. मुंगशी परिसरातील ज्वारी , गहू , हरभरा या पिकांबरोबर द्राक्ष फळबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे अक्षरशः शेतकऱ्यांची काढणीला आलेली ज्वारी भुईसपाट झाली आहे त्यामुळे वर्षभर खाण्याचे वांदे होतील काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे तसेच या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी मुंगशी परिसरातील शेतकरी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button