हरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणा-या 02 डम्पींग ट्रेलर असलेले ट्रॅक्टरवर कारवाई , सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

एकूण 14 लाख 15 हजार 500 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त

दक्षिण सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप त्यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करीत असताना पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे व त्यांच्या टिमला बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मौजे मुस्ती ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर येथील हरणा नदीच्या पात्रातून काही इसम डम्पींग ट्रेलर असलेले ट्रॅक्टर च्या सहाय्याने षासनाची परवानगी व राॅयल्टी नसताना चोरून वाळू काढून त्याची विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांनी पथकासह मौजे मुस्ती ता. दक्षिण जि. सोलापूर येथे जावून बातमीप्रमाणे खात्री केली असता, सदर ठिकाणी डम्पींग ट्रेलर असलेले ट्रॅक्टर मध्ये काही इसमांच्या मदतीने हरणा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून वाळू पाॅंईंटची खात्री झाल्यानंतर पाॅंईंट पासून काही अंतरावर वाहन थांबवून पायी चालत पाॅईंटवर गेले असता त्या ठिकाणी 02 डम्पींग ट्रेलर असलेले ट्रॅक्टर मध्ये काही इसमांच्या मदतीने वाळू भरत असताना मिळाल्याने घटनास्थळी मिळालेल्या 08 इसमांना ताब्यात घेवून त्यांचे विरूध्द वळसंग पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू पाॅईंटच्या ठिकाणाहून 02 वाळूने भरलेले डम्पींग ट्रेलरसह ट्रॅक्टरहेड असे एकूण 14 लाख 15 हजार 500 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 08 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर बाबत वळसंग पोलीस ठाणेस गुरंन 80/2023 भादविसंकाक 379, 34, व पर्यावरण कायदा कलम 9, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. शिरीश सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे, सफौ शिवाजी घोळवे, पोलीस अंमलदार बापू शिंदे, हरीदास पांढरे, मोहन मनसावाले, अनिस शेख, गणेश बांगर,अजय वाघमारे, अमोल जाधव, सुरज रामगुडे, यष देवकते यांनी बजावली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या