बार्शीकर नागरिकांचा जाचक कर रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्ष जनआंदोलन उभारणार : डॉ. विजय साळुंखे शहराध्यक्ष बार्शी शहर काँग्रेस कमिटी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : नगर परिषद हद्दीत राहणाऱ्या सर्वसामान्य बार्शीकर करदात्या नागरिकांवर बार्शी नगर परिषदेने जाचक कर लागू केले असून या जाचक कराच्या ओझ्यातून नागरिकांना मुक्ती मिळावी यासाठी बार्शी शहर काँग्रेस (आय) च्या वतीने नगर परिषद कार्यालयापुढे जाचक करमुक्ती सप्ताहाचे आयोजन दि 13 मार्च 2023 ते 17 मार्च 2023 दरम्यान करण्यात आले होते. शहरातील जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त करदात्या नागरिकांनी सहभाग नोंदवून करमुक्तीची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथरावजी शिंदे साहेब, विरोधी पक्षनेते मा अजितदादा पवार साहेब, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा नानाभाऊ पटोले यांच्याकडे नगर परिषदेचे मा मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण साहेब यांच्यामार्फत केली आहे.

प्रमुख मागणी
1) दरमहा 2% व वार्षिक 24% व्याजदराने थकीत करावर आकारण्यात आलेली दंड व शास्तीची रक्कम माफ करण्यात यावी तसेच थकबाकीदार करदात्यांवर दंड व शास्तीची रक्कम आकरण्यात येत असेल तर नियमित करदात्यांना 1% रिबेट ऐवजी 10% रिबेट मिळावा राज्य शासनाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामावरील थकबाकी शास्तीची रक्कम माफ केली असून त्यासारखाच दिलासा बार्शीकरांना मिळावा 2) नगर परिषद प्रशासनाला 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध असताना बार्शीकरांकडून घनकचरा व्यवस्थापन कराच्या नावाने निवासी करदात्यांना 350, व्यावसायिक करदात्यांना 600, व मिश्र वापर करदात्यांना 900 रुपये वार्षिक कर आकारण्यात आलेला आहे तो तात्काळ रद्द करावा 3) भुयारी गटारीचे काम अपूर्ण असताना 1 एप्रिल 2023 पासून मलनिस्सारान कर नव्याने शहरातील करदात्यांना द्यावा लागणार आहे हार्दिक प्रशासकीय ठराव असून तो ठराव रद्द करून भुयारी गटारीचे काम पूर्ण झाल्यानंतरच हार्दिक कर लागू करावा 4) नळजोडणी नसणाऱ्या करदात्यांकडून पाणीपुरवठा सेवाशुल्क म्हणून वार्षिक 300 रुपये कर आकारण्यात येत आहे हा कर आकारण्यापेक्षा नळजोडणी नसणाऱ्या करदात्यांना अल्प रुपयांमध्ये नळजोडणी द्यावी व वार्षिक 2500/- पाणीपट्टी असताना डिपॉझिट म्हणून घेण्यात येणारे 2500/- रुपये देण्याचा ठराव ही रद्द करावा. या अश्या प्रमुख मागणीसाठी बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉ विजय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या करमुक्ती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी सहभाग घेणाऱ्या नागरिकांचे व प्रसिद्धी देणाऱ्या जागरूक पत्रकार बांधवांचे आभार मानले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या