दिनबार्शीमहाराष्ट्र

श्री भगवंत प्रगट दिनानिमित्त भजन अनावरण सोहळ्याचे आयोजन

विजय थोरात यांच्या नव्या भगवंत भजनाचे २७ एप्रिल रोजी अनावरण

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : श्री भगवंत प्रगट दिनाच्या पूर्वसंध्येला भाविकांसाठी एक विशेष आध्यात्मिक कार्यक्रम श्री भगवंत मंदिर समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्री भगवंत भक्त विजय थोरात (कोरे) यांच्या नव्या भगवंत भजनाचे भव्य अनावरण करण्यात येणार आहे. हा भजन अनावरण सोहळा दि. २७ एप्रिल २०२६ रोजी श्री भगवंत मंदिर, बार्शी येथे श्री भगवंत प्रगट दिनाच्या पूर्वसंध्येला महाराजांचे प्रवचन संपल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता संपन्न होणार आहे.500
या कार्यक्रमात गुरुवर्य ह.भ.प. डॉ. जयवंत बोधले महाराज व मा. आ. राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते प्रोजेक्टरच्या माध्यमातून विजय थोरात यांच्या नव्या रचनेचे अनावरण करण्यात येणार आहे. या भजनाचे शीर्षक “माझ्या हृदयात वसतो भगवंत” व “माझ्या प्रत्येक श्वासात भगवंत” असे असून, भक्तीभावाने परिपूर्ण ही रचना भाविकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. हा कार्यक्रम बार्शीच्या नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यावेळी #तहसीलदार एफ. आर. शेख, #पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, अमृत नाना राऊत (माऊली उद्योग समूह), पत्रकार सचिन वायकुळे, डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशन, तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समिती, सोलापूर यांचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
5000
भक्तिमय वातावरणात पार पडणाऱ्या या कार्यक्रमामुळे श्री भगवंत प्रगट दिनाच्या उत्सवाला विशेष आध्यात्मिक रंग येणार आहे. गुरुवर्य डॉ. जयवंत बोधले महाराजांच्या प्रवचनाचा लाभ घेण्यासह, विजय थोरात यांच्या भक्तीमय काव्यरचनेचे सादरीकरण व अनावरण पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा मंदिर समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button