निवडबार्शी

जीवन स्नेह मधील ३ MDRT प्राप्त सदस्यांचा विशेष कौतुक सोहळा थाटात संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : शंभूराजे मंगल कार्यालय, बार्शी येथे टीम जीवन स्नेहचा वार्षिक कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. २०२२ मध्ये खूप मेहनतीने काम करून एलआयसी मधील एमडीआरटी २०२३ हा बहुमोल सन्मान मिळवलेल्या ३ सदस्यांचा मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
(१) MDRT सुनील जाधव
(२) MDRT प्रशांत उबाळे
(३) MDRT सौ. शुभांगी ढगे

आनंदाने सांगायची गोष्ट म्हणजे, या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन टीम जीवन स्नेह मधील सदस्यांनी एकत्रितपणे मिळून केले. आनंदाने सांगायची गोष्ट म्हणजे, या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन टीम जीवन स्नेह मधील सदस्यांनी एकत्रितपणे मिळून केले. या कौतुक सोहळ्यातून मिळालेल्या प्रेरणेने, अधिकाधिक कुटुंबांना आर्थिक संरक्षण देण्याचे मोलाचे सामाजिक काम करून, टीम जीवन स्नेह मधील सदस्यांचा प्रगतीचा आलेख २०२३ मध्ये निश्चितपणे आणखी उंचावणार, याबद्दल खात्री आहे.अतिशय आनंदाने पार पडलेल्या या कौतुक सोहळ्या बद्दल, उन्मेश पोतदार, विकास अधिकारी, भारतीय आयुर्विमा महामंडळ, शाखा बार्शी ( मो. ७३८५८९३८२५ ) माझ्या टीम जीवन स्नेह मधील सर्व सहकारी बांधवांचे तसेच या सत्कार मागील यशाचे मानकरी सर्व पॉलिसीधारक यांचे मी मनापासून आभार मानतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button