धार्मिकबार्शी

धनगरवाडी येथे विठ्ठल – रुक्मिणी मंदिराच्या दुरुस्तीला सुरवात

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : उत्तर बार्शी बार्शी तालुक्यातील आगळगाव पासून काटेगाव रोडवर पाण्याच्या टाकी जवळून धनगरवाडी कडे जाणारा रस्ता लागतो साधारण २ कि.मी अंतरावर धनगरवाडी हे गाव वसले असून या गावामध्ये सुमारे ५० ते ६० घरे असून हे गाव चांदणी नदीच्या तिरावर वसले आहे. गावामध्ये विठ्ठल – रुक्मिणी मंदीर असून त्याची पडझड झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून त्याची डागडुजी केलेली नाही. संक्रात सणासाठी महिलांना २ कि.मी अंतर चालून आगळगाव येथे यावे लागत होते.
धनगरवाडी येथील युवकानी एकत्र येवून विठ्ठल – रुक्मिणी मंदिराची दुरुस्ती करण्याचे चर्चा केली त्या चर्चा मधून सर्वांनी लोकवर्गणी गोळा करून मंदिराचा जिर्णोद्वार करण्याचे ठरवले आणी आज त्या मंदिराच्या कामास सुरवात करण्यात आली.
या मंदिरचे बांधकाम नांदेडचे सुप्रसिद्ध शिल्पकार बालाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे असे ग्रामपंचायत सदस्य जाधव यांनी सांगितले.
यावेळी सरपंच सौ.पुतळा गरड, बालाजी जाधव, दशरथ गरड, बबन गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील, आकाश जाधव, उमराव थिटे, नागेश गुळवे, नामदेव बावकर, अनंत हगवणे, प्रकाश जाधव, दत्तात्रय जाधव, भाऊसाहेब जाधव, माणिक बावकर, विशाल बावकर, मनोज हगवणे, गणेश जाधव, धनाजी जाधव रामलिंग जाधव विक्रम जाधव, रवी पवार, आकाश पवार, अजिंक्य जाधव सिताराम जाधव सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button